माझ्या लेख्ननाबद्दल संशय?

मी ब्लोग लिहायला सुरुवात केलिये हि बाब 'बातमी' या सदरात येते हे मला माहितच नव्हतं. त्याच काय आहे की, ब्लोग लिहिण ही तशी 'माझ्या' सहित्यिक गिरी ची सुरुवात असली तरी मी फ़ार महत्वाकांषी आहे बर.... भविष्यात माझ्या हातून (माफ़ करा.. माझ्या सूपीक डोक्यातून... ) श्रेष्ठ, प्रसिद्ध आणि चिरंतन अस काहितरी साहित्य प्रस्रुत होणार आहे ह्याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही. मागील दोन वर्षांचा कालावधी मी ११वी १२वीतील गहन प्रश्नांची ऊकल करण्यात व्यर्थ दवडला असला तरी परवाच माझ्या एका जीव:श्च कंठ:श्च शास्त्रद्न्य मित्राने "माझ्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करता माझ्या मेंदूतील शास्त्रीय कोडी सोडवणार्या भागापेक्शा कलागुणांच डीपार्टमेंट जास्त 'चालू' (active अशा अर्थाने बर का) आहे " अस सूतोवाच केलं.
म्हणूनच मी मानव जातीच्या कल्याणास्तव लेखन कराव, साहित्यात भरीव कामगिरी करावी... म्हणजे प्रथम (सू)प्रसिद्ध मासिकात 'पिझ्झा बर्गर संस्क्रुतीचा महिला मुक्ती आंदोलनावरील अनुकूल प्रभाव' या विषयावर शास्त्रशुद्ध लिखाण (ही कल्पना अलिकडेच दुसर्या लेखात वाचली, ती लगेच 'चोरून' त्यावर मी तद्न्य बुद्धीने श्रेष्ट लिखाण कराव), मग एका दिवाळी अंकात नव कविता, किंवा दुसर्याचा लेख स्वत:च्या नावावर छापणं, मग पाच सहा रहस्यमय इंग्रजी कांदंबर्यांच भाषांतर करून 'स्व'नामे प्रसिद्ध करणे, मग भूताखेताच्या विनोदी कथा असलेले दोन तीन संग्रह (ह्या कथा नंतर रामसेंना विकून पैसा कमवता येइल ही दूऽरद्रुष्टी), त्यानंतर जमल तर एखाद वैचारीक पुस्तक वगैर लिहावीत असा सुद्न्य विचार मी केला....

व्यक्तीत: मला स्वत:ला प्रसिद्ध लेखक वगैरे होण्याची फ़ारशी इच्छा नसली तरी न जाणो मनात आलेल इथे खरडता खरडता पुढे मी समाज प्रभोधनकारी लेखन करेनही बहुतेक.. बहुतेक म्हण्जे काय करेनच.
पण हे सगळ गुप्त पणे करायच, कारण 'अस महत्कार्य माझ्या हातून व्हायच असेल तर माझ लिखाण मी समीक्शकांपासून लपवून ठेवाव' असा सल्ला मला माझ्या त्याच जीव:श्च कंठ:श्च मित्राने दिला. (कारण समीक्शक लोकांच्या पुढे काहि माझ चोरलेल लिखाण खपणार नाहि , हे सत्य तो वदावयास विसरला बहुतेक... तो बोलला असता तरी मी सोयिस्करपणे तिकडे 'काना'डोळा केला असता ..)
तर जमेल तितक्या गुप्तपणे होइल तेवढे लिखाण करून मग मला जेव्हा कोणता तरी पुरस्कार मिळेल तेव्हा कळेलच ना सगळ्यांना...
त्याचे काय आहे मला तसे ब्लाग लिहायला खुप आवडत नाही पण आता कोणी आग्रह केला तर मग काही तरी लिहायचे म्हणून मी ब्लाग लिहयला लागलो पण मग माझ्या त्या मित्राला काय माहित काय वाटले म्हणे तुझी लायकी नाही इतके मस्त लिहायची मग मात्र
मला खूप राग आला आहे... माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाची चालवलेली अशी बदनामी...?
आता बघा मी काय करतो...
काय करणार हो..! फ़ार तर थोडा डोक्याला ताप देइन आणि अशा नव्या कल्पना कुठूनतरी चोरीन की त्या आमच्या मित्राला देखिल त्या माझ्याच वाटतील.
असो....
माझ्या समीक्शक मित्रांनो,.. हि तुम्हास शरणचिठ्ठी....

0 comments:

Copyright © 2008 - माझा ब्लॉग माझे विचार - is proudly powered by Blogger
Smashing Magazine - Design Disease - Blog and Web - Blogging4