आज जरा माझ्याविषयी

ज्यास्त बुचकल्यात न पडता मी तुम्हाला माझी ओळख करुन देतो. मी एक अज्ञानी, अडाणी पामर. ( असे म्हटले की म्हणणारा खूपच मोठ्ठा माणुस आहे हे आपोआप सिध्द होते.) तसा मी १२ वी पास. (सुचना:अजून नक्की नाही झाले ते ) माझे नांव रोहित खिरापते. आता शेक्सपियर ने म्हटले आहे म्हणे पण मी अजून तरी नाही वाचले " नावात काय आहे?" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल? असो. जन्मलो पुण्यातचा.ज्याला विद्येचे माहेघर म्हटले जाते.असा हा मी Pure पुणेकर.सध्यातरी १२ दिली असल्याने फ़क्त results ची वाट पाहाणे इतकेच माझ्या हाती आहे.
फावल्यावेळात अनेक संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर मलाही काहीतरी लिहिण्याची खुमखुमी सुटली. पण सत्य कल्पनेपेक्षा महा भंयकर कटू असते ह्याची जीवनात दुस~यांदा खात्री पटली. पहिल्यांदा पटली होती ती जेव्हा ११वी ला पहिल्यांदा मुलींशी बोलण्याचा प्रसंग आला, त्यावेळेस. पण म्हंटले प्रयत्न करायचाच. कोणी तरी म्हणालेच आहे " प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून. ह्याचा अर्थ एकाने " प्रयत्न करून करून आपला अंत झाल्यावर परमेश्वर भेटतो" असा घेतलेला. पण आता मला शंका येवू लागली आहे की खरच मला काही लिहिता येणार का? एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे? देखेंगे आगे आगे होता है क्या?
तुमच्या ग्रहकुंडलीतच मला `सहन' करण्याचा योग लिहिला असला तर मी तरी काय करणार?
आता एकच विनंती की कोणाचा कसलातरी सूड उगवायचा म्हणून माझे लिखाण वाचण्याचा आग्रह किंवा सुचना करू नका.

0 comments:

Copyright © 2008 - माझा ब्लॉग माझे विचार - is proudly powered by Blogger
Smashing Magazine - Design Disease - Blog and Web - Blogging4