.........

मोती होऊन सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्शा,दवबिंदु होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे चांगले.

काही नवीन मराठी चारोळ्या

मी आहेच मार्डन युगात
ताठ मानेने वावरणारा
एकीशी प्रेमाचे 'चट' करत
दुसरीला मनसोक्त फ़िरवणारा....!


तसं तुला पत्र पाठवायला
मी फ़ारच आतूर
पण कुरीयरवालासुध्दा तुझ्या
घरच्यांना फ़ितूर....!


तिच्या अकाऊंट मध्ये त्याला
प्रेम क्रेडीट करायचंय
त्यासाठी तरी एकदा त्याला
तिला एकांतात भेटायचंय....!


तू मला दिसलीस की
मनात माझ्या धडधडतं
थोडी लाजून हसलीस की
बजेट माझं गडगडतं...!

'वन्समोअर' ची परंपरा
आपल्याला लाभलीये
त्यामुळेच तर
लोकसंख्या वाढलीये....!


त्याचं तिचं प्रेमामध्ये
कधीतरी घसरतं पाऊल
भारत-पाक युध्दाची मग
दोघांच्याही घरी चाहुल....!

आज मी म. न. से. बद्दल जरा विचार करत होतो. तेव्हा मला दिसलेला एक लेख खरच्या त्यांचे महत्व पटवून दिल्याशिवाय राहत नाही....

मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.

समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.

राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.

ता.क. : शिवाजी पार्कवर १९ मार्च रोजी पार पडलेल्या MNS च्या पहिल्या वहिल्या जाहीर मेळाव्याला जमलेली विक्रमी गर्दी पाहून असे नक्कीच वाटते की, 'Well begun is half done.'
-
जय महाराष्ट्

जर हा लेख वाचून तुम्हाला देखिल आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त लोकांना ह्या बद्दल सांगा.आणि ह्या orkut community चे सद्स्य व्हा.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=9741051

काही पी.जे.हसू आले तर सांगा

Real च्या विरूध्द काय?
विचार करा......
hmmm its coconut
कसे काय बरे
आहो coconut=नारीयल (Na-Real)
हा हा हा...
=====================================================================
धर्मेंद्रला जर हेमामालिनी ला मला दुरध्वनी कर म्हणून सांगयचे असेल तर तो कसा सांगेल?
सोपे आहे तो म्हणेल
रिंग दे बसंती
:)

लाभले आम्हास भाग्य....


तशी ही कविता ब~याच जणांना माहित असेल पण माझ्या नव्यानेच वाचनात आली.आणि म्हणून मी ती इथे देत आहे.

मी परिपूर्ण नाही आहे

मी आता ब्लाग सुरू करून आता ४-५ दिवस झाले आहेत.माझ्या ब्लाग ला ब~याच लोकांनी visit केल्या आहेत पण कोणाला ही काही प्रतिक्रिया द्यावीशी नाही वाटली याचे दु:ख वाटले.पण जसे मी म्हटले आहे मी दुस~यांसाठी हा ब्लाग नाहीच पण तरी ही एक प्रोत्साहन म्हणून जर कोणाला काही लिहावे वाटले तर तुमचे स्वागत आहे. My comments are moderated becoz i m going to allow only marathi comments

www,rohit.youaremighty.com

आज आपण एक महान माणसाच्या सोबत आहात विश्वास नाही बसत मग visit करा.
www.rohit.youaremighty.com
खुपच छान आहे ही साईट.try करा आणि जर आवडली तर प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.पण फ़क्त मराठी प्रतिक्रियाच प्रसिध्द केल्या जातील याची नोंद घ्यावी


महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा
सदरच्या चित्रावद्दल दिलीप यांस धन्यवाद

माझ्या लेख्ननाबद्दल संशय?

मी ब्लोग लिहायला सुरुवात केलिये हि बाब 'बातमी' या सदरात येते हे मला माहितच नव्हतं. त्याच काय आहे की, ब्लोग लिहिण ही तशी 'माझ्या' सहित्यिक गिरी ची सुरुवात असली तरी मी फ़ार महत्वाकांषी आहे बर.... भविष्यात माझ्या हातून (माफ़ करा.. माझ्या सूपीक डोक्यातून... ) श्रेष्ठ, प्रसिद्ध आणि चिरंतन अस काहितरी साहित्य प्रस्रुत होणार आहे ह्याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही. मागील दोन वर्षांचा कालावधी मी ११वी १२वीतील गहन प्रश्नांची ऊकल करण्यात व्यर्थ दवडला असला तरी परवाच माझ्या एका जीव:श्च कंठ:श्च शास्त्रद्न्य मित्राने "माझ्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करता माझ्या मेंदूतील शास्त्रीय कोडी सोडवणार्या भागापेक्शा कलागुणांच डीपार्टमेंट जास्त 'चालू' (active अशा अर्थाने बर का) आहे " अस सूतोवाच केलं.
म्हणूनच मी मानव जातीच्या कल्याणास्तव लेखन कराव, साहित्यात भरीव कामगिरी करावी... म्हणजे प्रथम (सू)प्रसिद्ध मासिकात 'पिझ्झा बर्गर संस्क्रुतीचा महिला मुक्ती आंदोलनावरील अनुकूल प्रभाव' या विषयावर शास्त्रशुद्ध लिखाण (ही कल्पना अलिकडेच दुसर्या लेखात वाचली, ती लगेच 'चोरून' त्यावर मी तद्न्य बुद्धीने श्रेष्ट लिखाण कराव), मग एका दिवाळी अंकात नव कविता, किंवा दुसर्याचा लेख स्वत:च्या नावावर छापणं, मग पाच सहा रहस्यमय इंग्रजी कांदंबर्यांच भाषांतर करून 'स्व'नामे प्रसिद्ध करणे, मग भूताखेताच्या विनोदी कथा असलेले दोन तीन संग्रह (ह्या कथा नंतर रामसेंना विकून पैसा कमवता येइल ही दूऽरद्रुष्टी), त्यानंतर जमल तर एखाद वैचारीक पुस्तक वगैर लिहावीत असा सुद्न्य विचार मी केला....

व्यक्तीत: मला स्वत:ला प्रसिद्ध लेखक वगैरे होण्याची फ़ारशी इच्छा नसली तरी न जाणो मनात आलेल इथे खरडता खरडता पुढे मी समाज प्रभोधनकारी लेखन करेनही बहुतेक.. बहुतेक म्हण्जे काय करेनच.
पण हे सगळ गुप्त पणे करायच, कारण 'अस महत्कार्य माझ्या हातून व्हायच असेल तर माझ लिखाण मी समीक्शकांपासून लपवून ठेवाव' असा सल्ला मला माझ्या त्याच जीव:श्च कंठ:श्च मित्राने दिला. (कारण समीक्शक लोकांच्या पुढे काहि माझ चोरलेल लिखाण खपणार नाहि , हे सत्य तो वदावयास विसरला बहुतेक... तो बोलला असता तरी मी सोयिस्करपणे तिकडे 'काना'डोळा केला असता ..)
तर जमेल तितक्या गुप्तपणे होइल तेवढे लिखाण करून मग मला जेव्हा कोणता तरी पुरस्कार मिळेल तेव्हा कळेलच ना सगळ्यांना...
त्याचे काय आहे मला तसे ब्लाग लिहायला खुप आवडत नाही पण आता कोणी आग्रह केला तर मग काही तरी लिहायचे म्हणून मी ब्लाग लिहयला लागलो पण मग माझ्या त्या मित्राला काय माहित काय वाटले म्हणे तुझी लायकी नाही इतके मस्त लिहायची मग मात्र
मला खूप राग आला आहे... माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाची चालवलेली अशी बदनामी...?
आता बघा मी काय करतो...
काय करणार हो..! फ़ार तर थोडा डोक्याला ताप देइन आणि अशा नव्या कल्पना कुठूनतरी चोरीन की त्या आमच्या मित्राला देखिल त्या माझ्याच वाटतील.
असो....
माझ्या समीक्शक मित्रांनो,.. हि तुम्हास शरणचिठ्ठी....

आज जरा माझ्याविषयी

ज्यास्त बुचकल्यात न पडता मी तुम्हाला माझी ओळख करुन देतो. मी एक अज्ञानी, अडाणी पामर. ( असे म्हटले की म्हणणारा खूपच मोठ्ठा माणुस आहे हे आपोआप सिध्द होते.) तसा मी १२ वी पास. (सुचना:अजून नक्की नाही झाले ते ) माझे नांव रोहित खिरापते. आता शेक्सपियर ने म्हटले आहे म्हणे पण मी अजून तरी नाही वाचले " नावात काय आहे?" त्याला म्हणायला काय जाते. समजा उद्या त्याला कोणी छगन किंवा चम्या म्हणाले तर स्वत: त्याला काय वाटेल? असो. जन्मलो पुण्यातचा.ज्याला विद्येचे माहेघर म्हटले जाते.असा हा मी Pure पुणेकर.सध्यातरी १२ दिली असल्याने फ़क्त results ची वाट पाहाणे इतकेच माझ्या हाती आहे.
फावल्यावेळात अनेक संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर मलाही काहीतरी लिहिण्याची खुमखुमी सुटली. पण सत्य कल्पनेपेक्षा महा भंयकर कटू असते ह्याची जीवनात दुस~यांदा खात्री पटली. पहिल्यांदा पटली होती ती जेव्हा ११वी ला पहिल्यांदा मुलींशी बोलण्याचा प्रसंग आला, त्यावेळेस. पण म्हंटले प्रयत्न करायचाच. कोणी तरी म्हणालेच आहे " प्रयत्नांती परमेश्वर" म्हणून. ह्याचा अर्थ एकाने " प्रयत्न करून करून आपला अंत झाल्यावर परमेश्वर भेटतो" असा घेतलेला. पण आता मला शंका येवू लागली आहे की खरच मला काही लिहिता येणार का? एक वेळेस अनिल कुंबळे चा चेंडु वळेल, बिपाशा पुर्ण कपडे घातलेली दिसेल पण मला लिहीता येणे? देखेंगे आगे आगे होता है क्या?
तुमच्या ग्रहकुंडलीतच मला `सहन' करण्याचा योग लिहिला असला तर मी तरी काय करणार?
आता एकच विनंती की कोणाचा कसलातरी सूड उगवायचा म्हणून माझे लिखाण वाचण्याचा आग्रह किंवा सुचना करू नका.

दोन दिवस वेळ नव्हता मिळत लिहायला so आज आता वेळ काढून लिहायला बसलो आहे.प्यारेमोहन बघितला.
मला वाटतच नाही की त्यात विवेकने अभिनय केला आहे.अत्यंत फ़ालतू असा हा पिक्चर होता.जे तो बघायला जाणार असतील त्यांची नक्कीच निराशा होईल यात शंका नाही.त्यामध्ये लहान मुलांनापण हसू येणार नाही असे पकाऊ jokes आहेत.हा पिक्चर बघताना कळतच नाही की ते बहिरे आणि आंधळे आहेत का.फ़रदीन जी गाडी चालवतो तशी एखाद्या डोळस माणसाला पण नाही चालविता येणार.खर तर हि movie एक फ़सलेला प्रयत्न आहे.
बाकी नवीन काही करत नाही.सध्या मी पुन्हा वेबसाइट build करायला घेतली आहे.आता मी आणि माझी बहिण मिळून ती बनवत आहोत.so आशा आहे आता ती एक चांगली आणि daily updating वेबसाइट बनेल.

आज प्यारेमोहन बघणार आहे

विवेक सध्या चर्चेत असणारा hero आहे.त्याचा म्हणून आणि comedy movies ह्या कोणाच्या हि असल्या तरी बघायला आनंद वाटतो.एक Stree Relife म्हणून अश्या movies मस्त काम करतात.आता हि movie बघितली की तिचा review सांगणे ओघातच आले तेव्हा पुढच्या postमध्ये प्यारेमोहन बद्दल लिहिन.
तो पर्यंत एक छोटासा break :)

आज हि माझी पहिली मराठी पोस्ट

सध्या नवीन काही घडत नाही त्यामुळे life एकदम bore झाली आहे. वाटते कुठे तरी फ़िरायला जावे पण class मुळे ते सुध्दा नाही करता येत.So आता सध्या तरी net हे एकच माझे विरंगुळ्याचे साधन आहे.सध्या java शिकायचा प्रयत्न करत आहे.

This is my first meet with my E-Friend

I am going write my blog in english till i dont get to know how to write in marathi.
So yesterday i meet my first efriend.This is my 1st experince to meet any person whom i not seen till date.I was very frightened that how she will react when she will see me.What to talk with her and many more tensions come in my mind suddenly.But at the time of meet.When i seen her 1st smile.All my tensions goes aways and i met her with very confidence.I cant write so much more about our meet as i m not familiar with english.So this is enf for today.

श्रीगणेशा!!



वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ।
निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

Copyright © 2008 - माझा ब्लॉग माझे विचार - is proudly powered by Blogger
Smashing Magazine - Design Disease - Blog and Web - Blogging4