आज मी म. न. से. बद्दल जरा विचार करत होतो. तेव्हा मला दिसलेला एक लेख खरच्या त्यांचे महत्व पटवून दिल्याशिवाय राहत नाही....

मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.

समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.

राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.

ता.क. : शिवाजी पार्कवर १९ मार्च रोजी पार पडलेल्या MNS च्या पहिल्या वहिल्या जाहीर मेळाव्याला जमलेली विक्रमी गर्दी पाहून असे नक्कीच वाटते की, 'Well begun is half done.'
-
जय महाराष्ट्

जर हा लेख वाचून तुम्हाला देखिल आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त लोकांना ह्या बद्दल सांगा.आणि ह्या orkut community चे सद्स्य व्हा.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=9741051

2 comments:

गुरु said...

नमस्कार रोहित!
मराठी ब्लौगच्या जगात तुझे स्वागत आहे. फ़ार छान लिहितोस, मात्र काही गोष्टींची माहीती असने फ़ार महत्वाचे आहे. जसे -
१. एखादा फ़ोटो किंवा ईमेज दुस-या संकेतस्थळावरुन घेताना त्यांची परवानगी घेणे किंवा त्या फ़ोटो बद्दल तो कोठुन घेतला हे लिहीले पहीजे.
उदाः महाराष्ट्र दिनाचा फ़ोटो माझ्या - मी मराठी - [http://MeMarathi.blogspot.com]या संकेतस्थळावरुन घेतला आणी मला माहीत सुद्धा नाही !!!

२. एखादया संकेतस्थळाबद्दल लिहीताना त्याची माहीती घेणे - शिवाय - हे मत स्वतःचे आहे असे लिहिणे महत्वाचे.

३. शिवाय - एखाद्या व्यक्तीबद्द्ल लिहिताना सुद्धा - हे मत - विचार आपले स्वताचे आहेत -हे लिहिणे महत्वाचे - नाही का?

हम्म्म... बाकि चालु देत ..

शुभेछा!

सर्जा.
मी मराठी.

Proud Marathi said...

धन्यवाद दिलीपजी,तुमच्या सुचनांवर मी जरूर विचार करेन आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.

Copyright © 2008 - माझा ब्लॉग माझे विचार - is proudly powered by Blogger
Smashing Magazine - Design Disease - Blog and Web - Blogging4